या योजनेत दरमहा १५०० रुपये गुंतवून बनू शकता लखपती Post Office Recurring Deposit Scheme 2025

2 Min Read
Post Office Recurring Deposit 1500 Investment Marathi News

Post Office Recurring Deposit : सुरक्षित आणि सरकारी हमी असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची ‘रिकरिंग डिपॉझिट स्कीम’ ही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत चालवली जाणारी ही योजना कमी गुंतवणूकितून दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्यास मदत करते. सध्या या योजनेला विशेषतः ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विश्वासार्ह आणि नियमित बचतीसाठी पोस्ट ऑफिसची प्रभावी योजना

पोस्ट ऑफिसची ही आवर्ती ठेव योजना देशभरातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरली आहे. या योजनेत दरमहा ठराविक रक्कम गुंतवून पाच किंवा दहा वर्षांमध्ये मोठा फंड तयार करता येतो. सध्या या योजनेवर ६.७ टक्के वार्षिक व्याजदर लागू असून ते चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. ही योजना विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबे, नोकरदार आणि नियमित बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर मानली जाते.

१५०० रुपयांच्या मासिक बचतीतून तयार होतो लाखो रुपयांचा निधी

दरमहा फक्त १५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास पाच वर्षांमध्ये एकूण ९० हजार रुपयांची बचत होते आणि त्यावर सुमारे १७ हजार रुपये व्याज मिळून १ लाख ७ हजार रुपये मिळतात. जर हीच योजना पुढे दहा वर्षे सुरू ठेवली, तर एकूण मिळकत सुमारे अडीच लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे, अगदी मर्यादित गुंतवणूक करूनही मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी ही योजना उपयुक्त ठरते.

सरकारकडून दीर्घ मुदतीची सुविधा

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा कालावधी मूळतः पाच वर्षांचा आहे. मात्र, गुंतवणूकदार इच्छित असल्यास ही मुदत आणखी पाच वर्षांनी वाढवता येते. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक नियोजनातही ही योजना उपयुक्त ठरते.

जर तुम्ही कमी जोखमीचा आणि सरकारच्या हमीचा गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना एक उत्तम निवड ठरू शकते. या योजनेत नियमित मासिक बचत करून भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आधार बनवता येतो.

🔴 हेही वाचा 👉 १ मेपासून बदलणार हे नियम; एटीएम, रेल्वे, गॅस सिलिंडर आणि बँक खात्यांवर होणार थेट परिणाम.

Share This Article