या सरकारी योजनेत 10 हजार गुंतवून मिळवा 32 लाखांहून अधिक रक्कम – जाणून घ्या फायदेशीर फॉर्म्युला PPF Investment Calculator

1 Min Read
PPF Investment 10000 Per Month 15 Years

PPF Investment 10000 Per Month 15 Years : निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य अत्यंत महत्त्वाच असत. त्यासाठी कमी जोखमीची, सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना निवडण आवश्यक आहे. अशाच एक फायदेशीर सरकारी योजनेत तुम्ही दरमहा 10,000 रुपये गुंतवून तब्बल 32 लाखांहून अधिक रक्कम जमा करू शकता. ही योजना म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF Scheme).

PPF ही सरकारमान्य लॉंग टर्म बचत योजना असून सध्या या योजनेत 7.1% व्याजदर मिळतो. यामध्ये दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. ही योजना 15 वर्षांची असून नंतर 5-5 वर्षांनी वाढवता देखील येते.

10,000 रुपये दरमहा गुंतवल्यास काय होईल?

जर तुम्ही PPF खात उघडून दरमहा ₹10,000 गुंतवत गेलात, म्हणजे वर्षाला ₹1.2 लाख गुंतवणूक केली, तर 15 वर्षांनी तुम्हाला अंदाजे ₹32,54,567 एवढा परतावा मिळू शकतो – तोही कोणत्याही मार्केट रिस्कशिवाय.

PPF Investment योजना फक्त करबचत देत नाही, तर दीर्घकालीन स्थैर्य देखील देते. या योजनेचा वापर तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्यात मोठा फंड उभारण्यासाठी सहज करू शकता.

🔴 हेही वाचा 👉 जन्म दाखला नसला तरीही आधार कार्डवरील जन्मतारीख अपडेट करता येते, जाणून घ्या सोपी प्रक्रिया.

Share This Article