PVC Aadhaar Card Online Order Process UIDAI : तुमच्याकडे आधार कार्ड असणे हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. पण साध्या कागदी आधारऐवजी अधिक टिकाऊ व सुरक्षित पर्याय म्हणजे पीव्हीसी आधार कार्ड. जर तुम्ही अजूनही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड बनवले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्ही हे कार्ड घराबसल्या फक्त 50 रुपयांमध्ये ऑनलाईन ऑर्डर करू शकता – कोणत्याही ई महा सेवा केंद्र किंवा आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही!
पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय?
पीव्हीसी आधार कार्ड हे प्लास्टिकवर प्रिंट केलेले आधार कार्ड आहे जे पॉकेटमध्ये सहज ठेवता येते, खराब होत नाही आणि QR कोड, हॉलोग्राम, गिल्ट लेयरसह सुरक्षित असते.
घरबसल्या PVC आधार कसे बनवायचे? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
- UIDAI च्या वेबसाईटवर जा
सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा.
- ‘Order Aadhaar PVC Card’ निवडा
‘My Aadhaar’ विभागात जा आणि ‘Order Aadhaar PVC Card’ या ऑप्शनवर क्लिक करा.
- आधार नंबर व OTP भरा
तुमचा आधार नंबर व कॅप्चा कोड भरा.
नंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा.
तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा.
- पेमेंट करा आणि कन्फर्म करा
OTP भरल्यानंतर ‘Submit’ करा.
आता 50 रुपये ऑनलाईन पेमेंट करा.
यानंतर, काही दिवसांत तुमचे PVC आधार कार्ड पोस्टाने तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.
हे लक्षात ठेवा
तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे.
पीव्हीसी आधार कार्ड फक्त UIDAI च्या पोर्टलवरूनच ऑर्डर करता येते.
कोणत्याही एजंट किंवा ब्रोकरला यासाठी पैसे देण्याची गरज नाही.
🔴 हेही वाचा 👉 जन्म दाखला नसला तरीही आधार कार्डवरील जन्मतारीख अपडेट करता येते, जाणून घ्या सोपी प्रक्रिया.