रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! 28 तासात करा हे काम, नाहीतर कार्डवरून नाव गायब! Ration Card Ekyc Maharashtra Deadline

2 Min Read
Ration Card Ekyc Maharashtra Deadline News

Ration Card Ekyc Maharashtra Deadline : मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ज्यांना रेशनकार्डवर सरकारकडून मोफत धान्य मिळत आहे, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण 30 एप्रिल ही अंतिम तारीख असून त्यानंतरही जर ई-केवायसी पूर्ण नसेल, तर संबंधिताचे नाव थेट रेशन यादीतून वगळण्यात येणार आहे.

सरकारचा इशारा: यावेळी अंतिम मुदत वाढणार नाही!

याआधी सरकारने 6 वेळा अंतिम तारीख वाढवली होती. परंतु यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, 30 एप्रिलनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा मोफत रेशनचा हक्क कायमचा हिरावून घेतला जाऊ शकतो.

बनावट कार्डधारकांविरोधात मोहिम

सरकारच्या म्हणण्यानुसार, अनेक बनावट युनिट्स आणि अपात्र लाभार्थ्यांनी रेशनचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ई-केवायसीच्या माध्यमातून खरी पात्रता तपासली जात असून, फक्त गरजूंनाच लाभ देण्याचा सरकारचा उद्देश आहे.

घरबसल्या ई-केवायसी कशी कराल?

  1. Google Play Store वरून ‘मेरा eKYC’ हे अ‍ॅप डाउनलोड करा.
  2. यासोबत Aadhaar Face RD अ‍ॅपसुद्धा डाऊनलोड करा.
  3. अ‍ॅप उघडा, तुमचे लोकेशन आणि आधार क्रमांक टाका.
  4. कॅप्चा भरून OTP प्रविष्ट करा.
  5. आता ‘Face eKYC’ पर्याय निवडून कॅमेरा चालू करा आणि फोटो क्लिक करा.
  6. फोटो सबमिट केल्यानंतर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

अधिकृत वेबसाइटवरून करा ई-केवायसीसाठी:

  • महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “Ration Card e-KYC” लिंकवर क्लिक करा.
  • रेशन कार्ड क्रमांक व आधार क्रमांक टाका.
  • OTP द्वारे प्रमाणीकरण करून माहिती सबमिट करा.

जर तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय रेशन कार्डाच्या आधारे मोफत धान्याचा लाभ घेत असाल, तर ही शेवटची संधी आहे. ई-केवायसी आजच पूर्ण करून तुमचे नाव कायम ठेवा, अन्यथा 1 मेपासून तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात! पण काही महिलांना मिळणार नाही लाभ.

Share This Article