500 Rs Note News Today : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशभरातील सर्व बँकांना एटीएममध्ये फक्त ₹100 आणि ₹200 च्याच नोटा भरण्याचे आदेश दिल्याने ५०० रुपयांच्या नोटांच चलनातून हळूहळू उच्चाटन होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. आरबीआयच्या नव्या निर्देशानुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये मोठ्या रक्कमेच्या नोटांची जागा लहान मूल्याच्या नोटांना द्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, याआधी २००० रुपयांच्या नोटा चलनातून हळूहळू काढून घेतल्या गेल्या आणि आता त्या पूर्णतः व्यवहारातून बंद करण्यात आल्या आहेत. आता तशीच प्रक्रिया ५०० रुपयांच्या नोटांसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, RBI ने ५०० रुपयांच्या नोटा छापण्याचे प्रमाण कमी करण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे भविष्यात अशा नोटा बँकांकडे परत येतील आणि त्यांचे प्रमाण आणखी घटेल.
RBI च्या या निर्णयाचा उद्देश आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक ठेवण्यासोबतच, लहान मूल्याच्या नोटांचा सुलभ वापर वाढवणे असा असल्याच बोलल जात आहे. सरकार किंवा RBI कडून यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी ATM धोरणातून स्पष्ट संकेत मिळत आहेत.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या पॅन कार्डवर कुणीतरी तुमच्या नावाने परस्पर लोन घेतलय का? घरबसल्या अस तपासा.