Toll Tax Rules : टोल टॅक्स कोणाला भरायचा नसतो? केंद्र सरकारची अधिकृत यादी तपासा

2 Min Read
Toll Tax Free Persons India Government Rule

Toll Tax Free Persons India Government Rule : देशभरात राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करताना टोल टॅक्स भरण ही वाहनचालकांसाठी अनिवार्य प्रक्रिया असते. मात्र केंद्र सरकारन काही खास व्यक्तींना आणि विशिष्ट सेवा देणाऱ्या वाहनांना यामधून सूट दिली आहे. टोल माफीसाठी ठराविक अटी असून त्याचा लाभ फक्त ठराविक परिस्थितीतच मिळतो.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घटनात्मक पदाधिकारी, रक्षा व आपत्कालीन सेवा आणि विशेष प्रमाणपत्रधारक वाहन यांना टोल टॅक्सपासून सूट दिली जाते.

कोणाला मिळते टोल टॅक्सपासून सूट?

घटनात्मक व प्रशासकीय पदाधिकारी

राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह संसद सदस्य, आमदार व न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना अधिकृत प्रवासादरम्यान टोल भरावा लागत नाही. मात्र ही सूट त्यांच्यासाठी फक्त शासकीय कामावर जातानाच लागू असते.

लष्कर व पोलीस अधिकारी

वर्दीत असलेले व ड्युटीवर असलेले संरक्षण व पोलीस अधिकारी टोल माफीत येतात. त्यांना वेगळ कोणतही शुल्क देण्याची गरज नसते.

आपत्कालीन सेवांच्या वाहनांना माफी

अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि शववाहन यांना कोणत्याही परिस्थितीत टोल शुल्क लागू होत नाही. ही सेवा आपत्कालीन असल्यामुळे त्यांना विनाशुल्क मार्ग मोकळा असतो.

दिव्यांगांसाठी वाहन

दिव्यांग व्यक्तींकरिता खास अनुकूलित यांत्रिक वाहन ही टोल माफीस पात्र असतात. मात्र त्यासाठी वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.

परदेशी मान्यवर व निरीक्षणावर असलेले अधिकारी

राजकीय दौऱ्यावर असलेल्या परदेशी पाहुण्यांना आणि महामार्ग मंत्रालयाच्या निरीक्षण ड्युटीवरील अधिकाऱ्यांना देखील टोलपासून सूट मिळते.

स्थानिक रहिवाशांसाठी विशेष सुविधा

काही टोल प्लाझांवर स्थानिक रहिवाशांना वार्षिक पास दिला जातो, ज्यामुळे त्यांना वारंवार टोल भरावा लागत नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवा…

या सर्व टोल माफ्या ठराविक अटींवरच लागू होतात. शासकीय प्रवास, अधिकृत ओळखपत्र, आणि प्रमाणित दस्तऐवज दाखवण आवश्यक आहे. खाजगी प्रवासासाठी हे माफीनियम लागू होत नाहीत.

🔴 हेही वाचा 👉 रेशनकार्डच्या अर्जाची माहिती थेट WhatsApp वर मिळणार.

Share This Article