UPI New Rules 2025 In Marathi : भारतातील UPI (Unified Payments Interface) व्यवहार आणखी जलद होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 26 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या सर्क्युलरमध्ये सर्व बँकांना आणि पेमेंट अॅप्सना 16 जून 2025 पासून नवीन प्रोसेसिंग नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
UPI Payment Speed Change 15 Seconds Rule From June 16 : नवीन नियमानुसार, UPI व्यवहारांसाठी रिस्पॉन्स टाइम 30 सेकंदांवरून कमी करून 15 सेकंदांवर आणला जाणार आहे. या बदलामुळे व्यवहार अधिक वेगवान, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होतील, असा NPCI चा विश्वास आहे.
काय असणार आहेत नवीन UPI नियम?
पेमेंट रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स टाइम:
सध्याचा 30 सेकंदांचा वेळ आता फक्त 15 सेकंद केला जाईल.
ट्रान्झॅक्शन स्टेटस आणि रिव्हर्सल:
यासाठी 10 सेकंदांचा रिस्पॉन्स टाइम निश्चित करण्यात आला आहे.
यूजर अॅड्रेस व्हॅलिडेशन:
हे देखील 10 सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
NPCI ने सर्व बँका आणि पेमेंट सेवा पुरवठादारांना (PSP) हे नवे नियम काटेकोरपणे पाळण्यास सांगितले आहे. या बदलामुळे व्यवहार यशस्वी होण्याचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.
UPI व्यवहारांमधील अडथळ्यांमुळे घेतला निर्णय
NPCI चा हा निर्णय अलीकडील UPI सेवा अडथळ्यांनंतर घेण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांत 26 मार्च, 1 एप्रिल आणि 12 एप्रिल रोजी UPI सेवेत मोठे अडथळे आले होते. या वेळी अनेक व्यवहार अयशस्वी झाले आणि वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.
NPCI च्या तपासात आढळले की, काही बँकांकडून जुन्या व्यवहारांसाठी सतत API वर रिक्वेस्ट दिल्या जात होत्या, ज्यामुळे सिस्टिमवर ताण आला आणि प्रोसेसिंग स्लो झाली. त्यामुळे या नवीन नियमांमुळे यापुढे अशा अडथळ्यांपासून बचाव होण्याची शक्यता आहे.
UPI व्यवहारांचा वेग वाढणार
सध्या देशात दरमहा 25 लाख कोटी रुपयांहून अधिक UPI व्यवहार होतात. त्यामुळे NPCI चे हे पाऊल भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टीमला अधिक सक्षम, वेगवान आणि वापरकर्ता-केंद्रित बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये आयुष्मान कार्ड कसे बनवावे? कोण पात्र आणि काय आहेत फायदे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.