Vidhwa Pension Yojana Maharashtra Online Form : राज्यातील विधवा महिलांसाठी दरमहा आर्थिक मदत, असा करा अर्ज

2 Min Read
Vidhwa Pension Yojana Maharashtra Online Form

Vidhwa Pension Yojana Maharashtra Online Form : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिलांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत (Indira Gandhi National Widow Pension Scheme) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना राबवली जाते. ही योजना अशा महिलांसाठी आहे, ज्या पतीच्या निधनानंतर आर्थिक अडचणींना सामोऱ्या जात आहेत. अशा महिलांना त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी शासनामार्फत मासिक निवृत्तीवेतन दिल जात.

इंदिरा गांधी योजनेअंतर्गत अशा महिलांना दरमहा १५०० रूपये इतक अर्थसहाय्य मिळत. ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते. आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्याचा, त्यांचा आत्मसन्मान जपण्याचा आणि त्यांच जीवनमान उंचावण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी काही अटींचे पालन करण आवश्यक असत. त्यात वय ४० ते ७० वर्षांदरम्यान असण गरजेच आहे. अर्जदार विधवा असावी आणि ती दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातून असावी. त्याचबरोबर महिलेच किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव असनही आवश्यक आहे. अर्ज करताना पतीचा मृत्यू दाखला, वयाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, रहिवासी दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. इच्छुक लाभार्थींना त्यांच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतु केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष अर्ज करता येतो. त्याचबरोबर आपले सरकार पोर्टलवरूनही ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.

विधवा महिलांसाठी (Vidhwa Mahila Yojana) सुरू करण्यात आलेली ही योजना त्यांना केवळ आर्थिक आधार देत नाही, तर त्यांच्या स्वाभिमानाचेही रक्षण करते. सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र महिलांनी घेण आवश्यक आहे.

🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगार योजनेतून आता मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य.

Share This Article